LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

गडचिरोलीच्या घटनेनंतर आश्रम शाळांच्या कायापालटास मंजुरी, गोंदियाच्या 8 शाळांचा समावेश

गडचिरोलीच्या घटनेनंतर आश्रम शाळांच्या कायापालटास मंजुरी, गोंदियाच्या 8 शाळांचा समावेश

गडचिरोलीच्या घटनेनंतर आश्रम शाळांच्या कायापालटास मंजुरी, गोंदियाच्या 8 शाळांचा समावेश
गडचिरोलीतील एका आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शासन
गडचिरोलीच्या घटनेनंतर आश्रम शाळांच्या कायापालटास मंजुरी, गोंदियाच्या 8 शाळांचा समावेश

गोंदिया, 1 अक्टूबर 2026 — गडचिरोलीतील एका आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शासनाने शासकीय आश्रम शाळांच्या कायापालटासाठी 89 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यापैकी 33 प्रस्ताव विदर्भातील असून गोंदिया जिल्ह्यातील 8 शाळांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार पालघरमधील 13, नंदुरबारमधील 10, नाशिकमधील 9, अमरावतीमधील 8, गोंदियामधील 8 आणि गडचिरोलीमधील 5 शाळांचा या यादीत समावेश आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यवतमाळ जिल्ह्यातील असले तरी त्यांच्या जिल्ह्यातील केवळ 4 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या 16.18 टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळांमधील पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छता सुधारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मंजूर प्रस्तावांनुसार शाळांच्या इमारती, वसतिगृहे आणि परिसराची दुरुस्ती व सुधारणा केली जाणार आहे।

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog