LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात सेवा संकल्प अभियानात 6 रुग्णांवर यशस्वी हायड्रोसिल शस्त्रक्रिया

सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात सेवा संकल्प अभियानात 6 रुग्णांवर यशस्वी हायड्रोसिल शस्त्रक्रिया

सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात सेवा संकल्प अभियानात 6 रुग्णांवर यशस्वी हायड्रोसिल शस्त्रक्
शासकीय आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असले
सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात सेवा संकल्प अभियानात 6 रुग्णांवर यशस्वी हायड्रोसिल शस्त्रक्

सडक अर्जुनी, 24 सितंबर 2026 — शासकीय आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत 23 सप्टेंबर 2026 रोजी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात विशेष शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 6 गरजू रुग्णांवर हायड्रोसिलच्या (अंडवृद्धी) मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे शिबिर घेण्यात आले. कोकणा, डव्वा, कोलरगाव, मुंडीपार (पूर्व), उशिखेडा आणि चिखली येथील प्रत्येकी एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने सर्व शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यात डासांमुळे होणाऱ्या हिवतापापाठोपाठ हायड्रोसिलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. आरोग्य विभागाच्या हत्तीरोग रुग्ण शोध मोहिमेत अशा रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली होती, असे डॉ. पटले यांनी सांगितले.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog