LIVE TV
BOL BINDU NEWS सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🌡 आज का तापमान
तापमान लोड हो रहा है...

यवतमाळ: कुंपणाच्या विजेच्या तारेचा धक्का; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विज्ञापन
यवतमाळ: कुंपणाच्या विजेच्या तारेचा धक्का; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

यवतमाळ: कुंपणाच्या विजेच्या तारेचा धक्का; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

फोटो: शेतातील विद्युत कुंपण (प्रतीकात्मक)
ताजा
यवतमाळ: कुंपणाच्या विजेच्या तारेचा धक्का; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

यवतमाळ: पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतातील तार कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केळापूर तालुक्यातील घनमोड सोसायटी येथे रविवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. आकाश सुखदेव येवले (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे.

आकाश हा शेती व दुग्धव्यवसाय करीत होता. रविवारी सकाळी तो मित्र अखिल मुरलीधर डोळे याच्यासोबत गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. सायंकाळी गुरे घेऊन गावाकडे परतत असताना अरविंद डोळे यांच्या शेताजवळून जाताना शेताच्या कुंपणाला लावलेल्या उघड्या तारेचा आकाशच्या पायाला स्पर्श झाला. या तारेत विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याने विजेचा तीव्र धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.

तक्रारीत अनधिकृत वीजप्रवाहाचा आरोप

शेताच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाच्या तारेत विद्युत खांबावरून अनधिकृतपणे थेट वीजप्रवाह सोडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कोणतीही सुरक्षितता न बाळगता विद्युत प्रवाह सोडल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ राजेंद्र सुधाकर येवले (वय ३५, रा. घनमोड सोसायटी) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अरविंद मधुकर डोळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर पुढील तपास करीत आहेत.

या घटनेमुळे शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्याच्या धोकादायक पद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी तारेत वीज सोडताना कोणतीही सुरक्षितता न बाळगल्यास असे अपघात घडू शकतात, याकडे या घटनेने लक्ष वेधले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.

शेयर करें: Facebook X
विज्ञापन

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog

© BolBindu News • All Rights Reserved