LIVE TV
BOL BINDU NEWS सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🌡 आज का तापमान
तापमान लोड हो रहा है...

ठाणे: भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; दुकान पाडले

विज्ञापन
ठाणे: भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; दुकान पाडले

ठाणे: भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; दुकान पाडले

फोटो: रस्त्यावरील शोरमा दुकान (प्रतीकात्मक)
ताजा
ठाणे: भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; दुकान पाडले

ठाणे: भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील ए.के. शोरमा दुकानातून सोमवारी रात्री चिकन शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा झाली आहे. शोरमा खाल्ल्यानंतर काही तासांतच उलट्या, जुलाब, मळमळ आणि ताप अशी लक्षणे दिसू लागली. मंगळवारी दुपारपर्यंत बाधित नागरिक रुग्णालयात दाखल होऊ लागले. त्यापैकी १२ ते १३ जणांवर भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती (आयजीएम) उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, २ ते ३ जण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांसह दोन महिन्यांची गर्भवती महिला आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बाधितांमध्ये रेहाना फिरोज खान (वय ३८), झुबिया फिरोज खान (१६), मजहर ऊर्फ फैसल फिरोज खान (१५), हसना फिरोज खान (१०), उजमा फिरोज खान (६), सना मोमिन (३०), मुंतशा अन्सारी (२३), निगार अन्सारी (१५), कुनूत मोमिन (७), मरियम खान (२६) आणि कुलसुम मोमिन (२) यांचा समावेश आहे. सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार ते पाच जण उपचारासाठी रुग्णालयात आले होते. त्यांनी शोरमा खाल्ल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हळूहळू इतर बाधितांच्याही तक्रारी येऊ लागल्या आणि बाधितांची संख्या १७ वर पोहोचली. आणखी काही जणांनीही संबंधित दुकानातून शोरमा खाल्ल्याची शक्यता असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनधिकृत दुकान पाडले; गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने (बीएनसीएमसी) तातडीने कारवाई केली. सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टिकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे, आरोग्य अधिकारी फैसल ततली यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, निजामपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पालिकेच्या पथकाने वंजारपट्टी नाका येथील अनधिकृत ए.के. शोरमा दुकान पाडले आणि शोरमा तयार करण्याचे यंत्र जेसीबीच्या साहाय्याने तोडले. खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. निजामपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भिवंडीत यापूर्वीही शोरमा आणि इतर खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. जून महिन्यात खांडू पाडा परिसरातील एका दुकानातून शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने तब्बल १०७ जणांना विषबाधा झाली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जावर आणि अन्नसुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात एफडीएकडून सध्या अन्नसुरक्षेची कडक मोहीम सुरू असतानाही भिवंडीत अशी घटना समोर आल्याने नागरिकांकडून अन्न विक्री केंद्रांवर नियमित तपासणी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेयर करें: Facebook X
विज्ञापन

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog

© BolBindu News • All Rights Reserved