LIVE TV
BOL BINDU NEWS सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🌡 आज का तापमान
तापमान लोड हो रहा है...

Chandrapur: दुष्काळावर मातीसाठी 28,688 कामे, 16,356 सिंचन विहिरी

विज्ञापन
Chandrapur: दुष्काळावर मातीसाठी 28,688 कामे, 16,356 सिंचन विहिरी
फाइल फोटो: विकिमीडिया कॉमन्स
ताज़ा
Chandrapur: दुष्काळावर मातीसाठी 28,688 कामे, 16,356 सिंचन विहिरी

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 'विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (VBG-RAM-G)' अंतर्गत २८,६८८ जलसंधारण व विकासकामांचे नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

वार्षिक आराखडा २०२६-२७ मध्ये ८९९ मामा तलाव खोलीकरण, १६२० बोडी खोलीकरण, २३७५ नाला खोलीकरण, २४३८ शेततळे, १८९ पावसाळी पाणी साठवणूक, १६,३५६ सिंचन विहिरी यांचा समावेश आहे. भूजल पुनर्भरणासाठी ८२५ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी १०० याप्रमाणे ८२,५०० जलताऱ्यांची कामे; ९६ ग्रामपंचायतींमध्ये ६६,००० रोपे लावण्यात येणार आहेत.

१,४९५ कामे सुरू; प्रत्यक्ष काम डिसेंबरपासून

सध्या १,४९५ कामे सुरू असून त्यातून ३,९५७ मजुरांना रोजगार मिळत आहे. शेल्फवर १०,२३७ कामे तयार आहेत. उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर यांनी सांगितले की, नियोजनाचा उद्देश केवळ तात्पुरता रोजगार नव्हे, तर भविष्यातील पाणीटंचाई कमी करणे, शेती उत्पादकता टिकवणे आणि सिंचन बळकट करणे हा आहे. खरीप पिके शेतात असल्याने प्रत्यक्ष कामांना डिसेंबर-जानेवारीत (रब्बी हंगामात) सुरुवात होईल.

मुख्य बातें

  • २८,६८८ कामांचे नियोजन; १६,३५६ सिंचन विहिरी
  • ८२,५०० जलतारे; ६६,००० रोपे
  • १,४९५ कामे सुरू; ३,९५७ मजूर
  • प्रत्यक्ष काम डिसेंबर-जानेवारीपासून
शेयर करें: Facebook X
विज्ञापन

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog

© BolBindu News • All Rights Reserved