LIVE TV
BOL BINDU NEWS सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🌡 आज का तापमान
तापमान लोड हो रहा है...

स्टायफंड वाढीच्या मागणीसाठी गोंदियात एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे एक दिवसीय आंदोलन

विज्ञापन

स्टायफंड वाढीच्या मागणीसाठी गोंदियात एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे एक दिवसीय आंदोलन

स्टायफंड वाढीच्या मागणीसाठी गोंदियात एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे एक दिवसीय आंदोलन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), गोंदिया येथील एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी 24 सप्टेंबर
स्टायफंड वाढीच्या मागणीसाठी गोंदियात एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे एक दिवसीय आंदोलन

गोंदिया, 24 सितंबर 2026 — शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), गोंदिया येथील एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी 24 सप्टेंबर रोजी 'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स' (एएसएमआय) च्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. सध्या मिळणारा 18,000 रुपयांचा स्टायफंड वाढवून दरमहा 30,000 रुपये करण्यात यावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती.

इंटर्न डॉक्टरांनी भव्य रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. रुग्णालयात सलग 12-12 तास सेवा देऊनही मिळणारा मोबदला अत्यंत तोकडा असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंटर्नशिप कालावधीत ओपीडी, अपघात व आपत्कालीन विभाग, वॉर्ड ड्युटी, रात्रपाळी आणि विविध क्लिष्ट रुग्णसेवांमध्ये हे डॉक्टर अहोरात्र काम करतात.

वाढती महागाई, राहणीमान, जेवण आणि प्रवासाचा वाढता खर्च पाहता सध्या मिळणारे 18 हजार रुपये अत्यंत अपुरे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. महाराष्ट्रातील इंटर्न डॉक्टरांच्या योगदानाचा विचार करून स्टायफंडमध्ये सन्मानजनक वाढ करावी आणि ही मागणी शासनस्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी एएसएमआय-जीएमसी गोंदियाच्या वतीने करण्यात आली.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X
विज्ञापन

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog

© BolBindu News • All Rights Reserved