LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

गोंदियात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या हिंदी माध्यमाच्या यादीवर आक्षेप, चौकशीची मागणी

गोंदियात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या हिंदी माध्यमाच्या यादीवर आक्षेप, चौकशीची मागणी

गोंदियात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या हिंदी माध्यमाच्या यादीवर आक्षेप, चौकशीची मागणी
पवित्र पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या टप्पा-2 मध्ये गोंदिया जिल्ह्
गोंदियात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या हिंदी माध्यमाच्या यादीवर आक्षेप, चौकशीची मागणी

गोंदिया, 17 सितंबर 2026 — पवित्र पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या टप्पा-2 मध्ये गोंदिया जिल्ह्यात हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करत भावी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार योग्य पदे मिळाली नसल्याचा आरोप आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षणाधिकारी, गोंदिया यांच्याकडे करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडेही 16 सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देऊन दाद मागण्यात आली आहे.

भावी शिक्षकांच्या निवेदनानुसार उमेदवारांचे पसंतीक्रम पूर्णपणे लॉक करण्यापूर्वी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने तपासणे गरजेचे आहे. 16 सप्टेंबर रोजी गोंदियात पत्रकार परिषद घेऊन डी.एड. आणि बी.एड. धारकांनी इशारा दिला आहे की मागण्यांची वेळेत दखल न घेतल्यास सर्व बाधित उमेदवार एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog