LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल मुंबईला रवाना

संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल मुंबईला रवाना

संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल मुं
दुष्काळ यादीत गोंदिया जिल्ह्यातील केवळ तिरोडा तालुक्याचा समावेश झाल्याने संतप्त झालेले गों
संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल मुं

गोंदिया, 29 सितंबर 2026 — दुष्काळ यादीत गोंदिया जिल्ह्यातील केवळ तिरोडा तालुक्याचा समावेश झाल्याने संतप्त झालेले गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल 29 सप्टेंबर रोजी मुंबईला रवाना झाले. ते मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी मांडणार आहेत.

गोंदिया हा मुख्यतः धान उत्पादक जिल्हा आहे. पावसातील अनिश्चितता आणि खरीप पिकांवरील कीड-रोगांच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्य शासनाने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी गोंदियाचे उर्वरित सात तालुके यादीबाहेर आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळाच्या निकषांबाबत निवेदन सादर केले जाणार आहे. या भेटीनंतर सरकार गोंदिया जिल्ह्याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog