LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

गोंदियात खळबळ: रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांचा छापा

गोंदियात खळबळ: रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांचा छापा

गोंदियात खळबळ: रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांचा छापा
रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांचा छापा
गोंदिया शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली

गोंदिया, 30 सितंबर 2026 — गोंदिया शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 807/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 143(2)(3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या म.स.पो.नि. मनीषा निकम यांच्या पथकाने बजावली. पथकात स.फौ. जितेंद्र मिश्रा, पो.हवा. बलराज लांजेवार, पो.हवा. रूपेश सुखदेवे, म.पो.हवा. शिल्पा बडवाईक, पो.शि. रवींद्रकुमार मेश्राम, म.पो.शि. मंजू बागडे आणि चा.म.पो.शि. सुरेखा मेंढे यांचा समावेश होता.

शहरात अशा प्रकारे अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog