LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

देवरीतील मरामजोब-मासूलकसा घाटातील उड्डाणपूल पहिल्याच पावसात खचला, कंत्राटदारावर प्रश्नचिन्ह

देवरीतील मरामजोब-मासूलकसा घाटातील उड्डाणपूल पहिल्याच पावसात खचला, कंत्राटदारावर प्रश्नचिन्ह

देवरीतील मरामजोब-मासूलकसा घाटातील उड्डाणपूल पहिल्याच पावसात खचला, कंत्राटदारावर प्रश्नचिन्
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातील मरामजोब-मासूलकसा घाट पर
देवरीतील मरामजोब-मासूलकसा घाटातील उड्डाणपूल पहिल्याच पावसात खचला, कंत्राटदारावर प्रश्नचिन्

देवरी, 27 सितंबर 2026 — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातील मरामजोब-मासूलकसा घाट परिसरात वन्यजीव संरक्षणासाठी बांधण्यात आलेला उड्डाणपूल पहिल्याच पावसात एका बाजूने खाली बसला असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या बांधकामाचे कंत्राट शासनाने अग्रवाल ग्लोबल कंपनीला दिले होते.

कंपनीने सुमारे पाच वर्षांत या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले होते आणि त्यावरून वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र मुसळधार पावसानंतर पुलाचा एक भाग खचल्याने निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.

या घटनेमुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून होत आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog