LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

बार्टी-सारथी प्रवेश परीक्षा केंद्रावर गोंधळ, परीक्षा रद्द; गोंदियासह शंभरहून अधिक परीक्षार्थींना मनस्ताप

बार्टी-सारथी प्रवेश परीक्षा केंद्रावर गोंधळ, परीक्षा रद्द; गोंदियासह शंभरहून अधिक परीक्षार्थींना मनस्ताप

बार्टी-सारथी प्रवेश परीक्षा केंद्रावर गोंधळ, परीक्षा रद्द; गोंदियासह शंभरहून अधिक परीक्षार
शासनाच्या बार्टी, आर्टी, सारथी आणि अमृत या संस्थांच्या वतीने एमपीएससी पूर्व तयारी परीक्षेस
बार्टी-सारथी प्रवेश परीक्षा केंद्रावर गोंधळ, परीक्षा रद्द; गोंदियासह शंभरहून अधिक परीक्षार

भंडारा, 22 सितंबर 2026 — शासनाच्या बार्टी, आर्टी, सारथी आणि अमृत या संस्थांच्या वतीने एमपीएससी पूर्व तयारी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन मिळावे यासाठी आयोजित ऑनलाइन प्रवेश परीक्षेत मोठा गोंधळ उडाला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि साकोली या दोन परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

भंडारा येथील नूतन महाराष्ट्र विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर दुपारी साडेचार वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि वीज पुरवठा खंडित झाला. केंद्रावरील जनरेटरही बंद असल्याने परीक्षार्थींनी मोठा गोंधळ घातला. या परीक्षेसाठी भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातूनही शंभरपेक्षा अधिक परीक्षार्थी भंडाऱ्यात पोहोचले होते.

विद्यार्थ्यांच्या संतापानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने बार्टीचे मुख्यालय पुणे येथे संपर्क साधून परीक्षा रद्द करून ती 24 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या घटनेमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog