LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

महावितरणचा नवा नियम: वीज बिल थकले तर सर्व्हरवरूनच आपोआप वीज कट होणार

महावितरणचा नवा नियम: वीज बिल थकले तर सर्व्हरवरूनच आपोआप वीज कट होणार

महावितरणचा नवा नियम: वीज बिल थकले तर सर्व्हरवरूनच आपोआप वीज कट होणार
वीज बिल थकले तर सर्व्हरवरूनच आपोआप वीज कट होणार
महावितरणच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे।

गोंदिया, 15 सितंबर 2026 — महावितरणच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वीज बिल थकले तर वीज कापण्यासाठी महावितरणचा कोणताही कर्मचारी घरी येणार नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे मुख्य सर्व्हरवरूनच वीजपुरवठा स्वयंचलितपणे बंद केला जाणार आहे. हा नियम गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.

ग्राहकांसाठी दिलासा म्हणजे थकीत रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांच्या आत वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाईल. ग्राहकांना अचानक अंधारात राहावे लागू नये म्हणून मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 नंतरच ही स्वयंचलित कारवाई केली जाणार आहे.

मात्र ग्रामीण भागात अनेक नागरिक अजूनही कागदी बिलांवर अवलंबून असल्याने या डिजिटल सिस्टीममुळे गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थकीत बिलांची वसुली वेगाने करण्यासाठी महावितरणने ही नवी प्रणाली लागू केली असून ग्रामीण भागातील लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog