LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

गोंदिया जिल्ह्यात डीजे, प्लाझ्मा व प्रेशर-मिड साऊंडवर कडक निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश

गोंदिया जिल्ह्यात डीजे, प्लाझ्मा व प्रेशर-मिड साऊंडवर कडक निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश

गोंदिया जिल्ह्यात डीजे, प्लाझ्मा व प्रेशर-मिड साऊंडवर कडक निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रति
आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्
गोंदिया जिल्ह्यात डीजे, प्लाझ्मा व प्रेशर-मिड साऊंडवर कडक निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रति

गोंदिया, 19 सितंबर 2026 — आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात डीजे साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशर-मिड साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.01 वाजेपासून 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 11 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार 11 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा आदेश काढला आहे.

आदेशानुसार डीजे, टॉप-मिड-बेस मल्टीस्पीकर, प्लाझ्मा आणि प्रेशर-मिड साऊंड सिस्टीमचे मालक, चालक, ऑपरेटर आणि व्यावसायिक पुरवठादारांना हा आदेश लागू राहणार आहे. गणेश आणि दुर्गादेवी मंडळांसह सर्व सार्वजनिक उत्सवांच्या आयोजकांना ध्वनी प्रदूषण नियमांचे आणि विहित डेसिबल मर्यादांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog