LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

गोंदियाच्या ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विशेष बैठक

गोंदियाच्या ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विशेष बैठक

गोंदियाच्या ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विशेष ब
अपर जिल्हाधिकारी घोरपडे यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्ज
गोंदियाच्या ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विशेष ब

गोंदिया, 30 सितंबर 2026 — अपर जिल्हाधिकारी घोरपडे यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. प्राचीन संस्कृत महाकवी भवभूतींची जन्मस्थळी पदमपूर, वाकाटककालीन ऐतिहासिक नगरी नागरा आणि विख्यात ऐतिहासिक टेकडी प्रतापगड या स्थळांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

स्थानिक इतिहासप्रेमी व संशोधकांच्या भेटीगाठी घेऊन ऐतिहासिक स्थळांचे गमावलेले गौरव पुनर्स्थापित करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार जाणून घेतल्यानंतर पुरातत्त्व विभाग नागपूरच्या संचालकांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर 29 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नागपूर पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक मयुरेश खडके आणि पुरातत्त्व सहाय्यक मारुती बुरटुकने प्रमुख उपस्थित होते. याशिवाय माजी उपआयुक्त सुनील देशमुख, ज्येष्ठ इतिहासकार ओ. सी. पटले, ॲड. लखनसिंह कटरे, संतोष पुंडकर, डॉ. कल्पना सांगोडे, दुलीचंद बुद्धे, प्रा. चंद्रप्रकाश पटले, नारायण जमईवार आणि योगेश पारधी यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी उपस्थित होते.

महाकवी भवभूतींची पावन जन्मभूमी पदमपूर उपेक्षित राहणे हे दुर्दैव असल्याचे मत ज्येष्ठ इतिहासकार ओ. सी. पटले यांनी व्यक्त केले. या स्थळांना इतिहासविषयक चेतनेचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जाणार असल्याचे बैठकीत ठरले.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog