LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

कडोतीटोला शाळेला 'चला शाळेला भेटूया' पथकाची भेट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

कडोतीटोला शाळेला 'चला शाळेला भेटूया' पथकाची भेट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

कडोतीटोला शाळेला 'चला शाळेला भेटूया' पथकाची भेट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
सालेकसा तालुक्यातील कडोतीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 22 सप्टेंबर 2026 रोजी शास
कडोतीटोला शाळेला 'चला शाळेला भेटूया' पथकाची भेट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

सालेकसा, 22 सितंबर 2026 — सालेकसा तालुक्यातील कडोतीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 22 सप्टेंबर 2026 रोजी शासनाच्या 'चला शाळेला भेटूया' उपक्रमांतर्गत तपासणी पथकाने भेट दिली. संचालक प्रकाशजी मुकुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता 4थी व 5वीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची पाहणी करण्यात आली.

पथकाने विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता, गणितीय क्रिया आणि अभिव्यक्ती गुणवत्तेची तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करताना वर्गशिक्षक अनिल पडळकर यांच्या कार्याचेही अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

यावेळी शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधा, पोषण आहार, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, शालेय रजिस्टर, समित्यांचे अहवाल, तक्रार पेटी, चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक, शैक्षणिक साहित्याची पाहणी करण्यात आली.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog