वीज अपघातात पशुधनाच्या मृत्यूवर आता 50 हजारांपर्यंत नुकसानभरपाई, महावितरणचा निर्णय
गोंदिया, 20 सितंबर 2026 — महावितरणच्या विद्युत वाहिन्या किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत भरीव वाढ करण्यात आली आहे. महावितरणने 16 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रशासकीय परिपत्रकानुसार ही सुधारित मदत त्याच दिवसापासून लागू झाली आहे.
नव्या निर्णयानुसार गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव यांसारख्या मोठ्या जनावरांचा वीज अपघातात मृत्यू झाल्यास आता 50 हजार रुपये, तर शेळी, मेंढी आणि वासरू यांसाठी 5 हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. यापूर्वी 2008 च्या परिपत्रकानुसार भरपाई दिली जात होती.
वाढती महागाई आणि पशुधनाच्या किमती लक्षात घेऊन भरपाईच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले असून प्रस्ताव तयार करण्याची उर्वरित प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
Comments
Post a Comment