LIVE TV
बोल बिंदु न्यूज़ सच सबसे पहले
BREAKING
ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

28 सप्टेंबरला 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्यासाठी गोंदियात प्रशासनाला निवेदने

28 सप्टेंबरला 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्यासाठी गोंदियात प्रशासनाला निवेदने

28 सप्टेंबरला 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्यासाठी गोंदियात प्रशासनाला निवेदने
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रतिवर्षी 28 सप्टेंबर ह
28 सप्टेंबरला 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्यासाठी गोंदियात प्रशासनाला निवेदने

गोंदिया, 24 सितंबर 2026 — महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रतिवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांसह हा दिवस व्यापक पातळीवर साजरा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य (गोंदिया) च्या वतीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू मारवाडे यांनी इशारा दिला आहे की ज्या कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले आहे, त्या सर्व कार्यालयांमध्ये 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिवस साजरा झाला की नाही, याची खात्री करण्यासाठी महासंघातर्फे माहिती अधिकाराचे (आरटीआय) अर्ज लावून अधिकृत दस्तावेज मागवून पडताळणी केली जाईल.

संस्थापक-अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष मोहीम राबवून ही निवेदने सादर करण्यात आली. 24 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि डुग्गीपार पोलीस स्टेशन येथेही निवेदने देण्यात आली.

© Bolbindu News Channel • All Rights Reserved
शेयर करें: Facebook X

Comments

संबंधित खबरें

लोड हो रहा है...

Search This Blog